आई इथे जपानला तीन महिन्यांसाठी आली होती. त्यात नेमकी शेवटचा महिनाभर आजारी पडली. दवाखान्यात अनेक टेस्ट्स झाल्या आणि काविळीचं निदान झालं. जपानमधे आता कावीळ अस्तित्वात नाहीये, त्यामुळे ती का झाली असावी आणि त्यावर औषध योजना काय, ह्यावर इथल्या डॉक्टरांनी भरपूर काथ्याकुट केला. आणि शेवटी ती भारतात जाई पर्यंत म्हणजे पुढचे तीन आठवडे रोज तीन सलाइन घेण्यासाठी तिला दवाखान्यात घेऊन यायला सांगितलं. तिला घेऊन रोज मी आणि वहिनी दवाखान्यात जात होतो.
आई तशी एकदम खंबीर बाई आहे आणि त्यातून ती फारशी आजारी पडत नाही. पण कधी जर क्वचित काही झालं तर मात्र ते आजारपण तिला एरवी सारखं खंबीरपणे घेता येत नाही. आधीच आजारपणामुळे भरपूर अशक्तापणा आलेला. त्यातून परक्या देशात मुलाकडे आणि मुलीकडे आल्यावर आपल्याला आजारपण यावं, हे डॉक्टर आपल्या विषयी काय बोलतायत ते कळत नाही ह्यामुळे ती अजुनच ढेपाळून गेली.
डॉक्टरांनी कुठल्याही नवीन टेस्ट करायला सांगितल्या की ही आधी भीतीनी "नाही" म्हणायची. मग आमच्या दोघींपैकी कोणीतरी एकजण त्या टेस्टलाही तिच्याबरोबर आत जायचो. मधुनच ती "कशाला रोज सलाइन? म्हणतात की कावीळ होते आपोआप बरी" असं म्हणायची. मग आई आणि डॉक्टर ह्या दोघांनाही एकमेकांची मतं समजावून सांगत बसायचो.
रोज तीन सलाइन म्हणजे साधारण पाच तास लागायचे. मग आमच्या मुलांच्या शाळा आणि बाकी अॅकटिविटिजच्या वेळा सांभाळून आम्ही दवाखान्याच्या चकरांचं वेळापत्रक आखलं. शनिवार रविवार नवरा आणि भाऊ हे दोघंही मदतीला असायचे.
दरम्यान रोज दवाखान्यात जाऊन जाऊन पहिल्या आठवड्याभरात तिथले रोज किंवा नेहमी येणारे चहरे ही ओळखायला लागले. सगळ्या जपानी जनतेत आमचं भारतीय कुटुंब, विशेषतः आई तिच्या पंजाबी ड्रेस आणि कुंक ह्यामुळे उठून दिसायची. मग तो सलाइनचा "मोबाइल" स्टँड हातात धरून हळुहळु चालत बाथरुमला वगैरे जायला आम्ही तिला मदत करायचो. बाहेर बसलेले लोक, खास करून म्हातारी माणसं, नेहमी त्या वेळेला आमच्याकडे बघत बसायचे. सुरुवातीला "या भागात परदेशी लोक फारसे दिसत नाहीत म्हणून इतकं कुतुहलानी बघत असतील" असं आम्हाला वाटायचं. पण थोड्याच दिवसात हे "उठून दिसणं" केवळ परदेशी लोक आहेत म्हणून नाही तर आमच्या सतत आईच्या अवतीभवती असण्यामुळे, तिला सगळीकडे कंपनी देण्यामुळे आहे हे हळुहळु लक्षात यायला लागलं.
आजुबाजुला बघितल्यावर जाणवलं ही ह्यातली बहुसंख्य वयस्कर लोकं कोणाच्याही सोबतीशिवायच आलेली असत. मग ते निम-म्हातारे असोत की अगदी जख्ख म्हातारे! कधी कधी एखादं म्हातारं जोडपं एकमेकांच्या साथीनी यायचं. ते दोघंही इतके थकलेले की कोण कोणाला सोबत करतंय हा प्रश्न पडावा. एंडोस्कोपी, सिटी स्कॅन किंवा एक्सरे विभागाच्या बाहेरही ही लोकं इतकी शांतपणे बसलेली असायची की जणू काही विमानात चढायची घोषणा होण्याची वाट बघतायत. काहीजणं आपापला सलाइनचा चालता- फिरता स्टँड घेउन सोफ्यावर निवांत बसून टिव्ही बघत असत. जसं काही टिव्ही बघणं हे खरं काम आहे आणि फावल्या वेळात सलाइन उरकून घेतायत.
आम्हाला नेहमी कुतूहल वाटायचं की ह्यांच्या बरोबर दवाखान्यात यायला घरातल्या कोणालाच वेळ कसा नाही? गेल्या १० वर्षात इथल्या जीवन पद्धतीची कितीही सवय झाली असली तरी आजारी माणसानी दवाखान्यात एकटंच यायचं ही कल्पना पचनी पडायला जरा अवघडच गेली.
ह्यामधे कुठेही दोन परस्पर भिन्न समाजाची तुलना करण्याचा हेतु निश्चितच नाही. मला टिपिकल भारतीय चष्म्यातून ह्यांच्याकडे बघताना एकीकडे त्यांचं दवाखान्यात एकट्यानी येउन सगळं आपापलं manage करणं हे किंचित "बिचारं" वाटायचं. पण तरी त्यांच्या वागणुकीतुन मात्र ते कुठेच नाही दिसलं. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
जपानी लोकांना त्यांच्या चष्म्यातून आम्हा भारतीय रुग्णांकडे बघताना नक्की काय वाटत असेल?
शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०
सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०
तोत्तोचान
आत्ता पर्यंत काही जपानी पुस्तकं वाचून झाल्येत. त्यात "मादोगीवा-नो-तोत्तोचान" चा ही समावेष आहे.
चेतना सरदेशामुख यांनी मराठीत अनुवाद केलेलं "तोत्तोचान" खुप पूर्वी वाचलं होतं. ते आणि मूळ रुपातलं "तोत्तोचान" वाचण्यात मधे बरीच वर्षं पण गेली होती. आणि दोन्ही रूपं आपापल्या परीनी आवडली सुद्धा होती.
मध्यंतरी "मायबोली" वर गप्पांमधे जपानी पुस्तकं जपानी मधून वाचण्याचा अनुभव कसा वाटला, ह्या विषयी चर्चा झाली. आत्ता पर्यंत ह्या दृष्टीनी कधी विचारच केला नव्हता. तेच पुस्तक फक्त दोन वेगवेगळ्या भाषांमधुन वाचलं. जपानी मधून वाचल्यामुळे जपानी शब्द संग्रहात भर पडली, इतकाच विचार त्यामागे होता.
सद्ध्या अवनीला अनुवादित "तोत्तोचान" वाचायला दिलंय. काल त्यातलं "३२ वेळा चावून खा" हे गाणं तिनी वाचायला सुरुवात केली. अनुवादात गाण्याच्या रचनेविषयी, चाली विषयी फारसं काही वर्णन नाहीये. त्यामुळे "तोत्तोचानच्या शाळेत हे गाणं कसं म्हणत असतील?" हा तिला प्रश्न पडला आणि काही केल्या हे मराठी गाणं छानश्या चालीत म्हणता येईना. मग आम्ही मूळ पुस्तकातून ते गाणं शोधलं. मूळ जपानी गाणं आहे,
"योSकू कामे यो
ताबेमोSनो ओ
कामे यो कामे यो कामे यो कामे यो
ताSबेमोनो ओ"
(शब्दश: अर्थ प्रत्येक घास नीट चावुन खा )
ह्या गाण्याला तोत्तोचान च्या मुख्याध्यापकांनी "रोS रोS रोS योअर बोट ..... " ह्या गाण्याची चाल लावली होती.
झालं! हे सांगितल्यावर अवनीला मस्त एक किल्ली बसली. आणि "योSकू कामे यो....ताबेमोSनो ओ" हे तालासुरात सुरु झालं.
तेंव्हा मला प्रकर्षानी जाणवलं ते मूळ भाषेतलं कथन आणि अनुवादित कथन यातला फरक!
अनुवाद करताना बरेचदा बंधनं येतात. मूळ भाषेतला एखाद्या शब्दाचा, वाक्यरचनेचा अनुवाद कधीतरी चपखल प्रतिशब्द न मिळाल्यामुळे फापटपसारा वाटू शकतो. तर कधी मूळ रूप आणि भावना बाजुला पडतात.
आज पासून पुन्हा एकदा मी जपानीतुन "मादोगीवा नो तोत्तोचान" वाचायला सुरुवात केल्ये. वाचनानी गती अजुन घेतली नाहीये. पण जपानी भाषेचा खास लहेजा अनुभवायला, फक्त जपानीतच चपखल बसणारे शब्द पुन्हा वाचायला, अनुभवायला मजा येत्ये. त्या बद्दलचा अनुभव लिहायला किल्ली बसल्ये. लवकरच त्याबद्दल लिहायला नक्की आवडेल.

रविवार, ४ जुलै, २०१०
मर्मबंधातली ठेव ही!
रोज दुपारी अवनीला शाळेतुन घरी घेऊन येताना letter box मधे डोकवायचं, काही पत्र असतील तर घ्यायची, हा माझा आणि अवनीचा शिरस्ता! हल्ली पत्र म्हणजे काय तर सगळी छापील बीलं नाहीतर कसली तरी माहिती पत्रकं. किती दिवस झाले कुणाचं हस्ताक्षरातलं पत्र आलेलं नाही. मी सुद्धा कोणाला पत्र लिहिलं, त्याला सुद्धा किती दिवस झाले. मागच्या चार पाच वर्षांपर्यंत भारतातून पत्र येत होती. आईची, मावशी-आत्याची, आणि माझ्या मैत्रिणीची आरतीची! अगदी खुप नियमीत नाही पण निदान अधून मधून तरी. मी सुद्धा उत्साहानी लिहायची तेंव्हा. आता सगळीकडे फोन आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे रोजच्या रोज इ-मेल आणि वरचेवर फोन होतातच. मग कशाला येत्ये पत्र लिहायची वेळ?
मला अजुन आठवतय लहानपणी आम्ही काय वाट बघायचो पोस्टमन काकांची! घराच्या खिडकीत बसून लांबवर नजर ठेवायची बरोबर सकाळी ११ वाजता. मग ते काका दिसले की विचारायाचो "काकाssss, दाते आहे?" किंवा कधीकधी आम्ही विचारायच्या आत तेच पुकारा करायचे "दातेsssssss!".
आमचं एकत्र कुटुंब. आणि आमच्या मावश्या, दोन आत्या, आजी आजोबा असे बरेच जणं पुण्याच्या बाहेर होते. त्यामुळे बरेचदा कुणाचं न कुणाचं पत्र असायचंच. आमच्या सगळ्यांच्या वाढदिवसांना, आईबाबांच्या आणि काका-काकुच्या लग्नाच्या वाढदिवसाला कोणाकोणा नातेवाइकांची पत्र यायची. तशीच कधी नुसती खुशालीची पत्र तर कधी खुशखबर देणारी पत्र. परिक्षा जवळ आली की मुंबईची आत्या आम्हा सगळ्या भावंडांना शुभेच्छा द्यायला हमखास पत्र लिहायची. "मन शांत ठेउन पेपर लिहा. प्रश्नपत्रिका नीट वाचा. बरोबर extra पेन-पेन्सिल असु देत. उत्तरं नीट तपासून पहा" असा अगदी ठरलेला मजकुर असायचा. त्यावरून आम्ही भावंडं चेष्टाही करत असु. पण आम्हाला तिचं पत्र आलं की परीक्षेला जाताना छान वाटायचं. मग रिझल्ट लागल्यावर तिचं शाबासकीचं पत्र यायचं.
आईची एक मैत्रिण अमेरिकेला असते. तिचीसुद्धा आईला अधुन मधुन पत्र येत. आईकडे तिच्या पत्रांचा एक गठ्ठा जपून ठेवलेला होता. कधीतरी आई ती पत्र वाचत बसायची. त्यामुळे मला सुद्धा स्वतःला आलेली पत्र जपून ठेवायची सवय लागली ती आजपर्यंत! पत्र पाठवणं, मग आपल्या पत्राला उत्तर येण्याची वाट बघणं, आलेली पत्र परत परत वाचणं ह्यातली एक वेगळीच गंम्मत मी अनुभवायला लागले.
आज अनेक दिवसांनी जुन्या पत्रांचं ते सगळं बाड बाहेर काढलं. एकेक पत्र घेऊन वाचायला लागले. या पत्रांना कसं छान आपापलं व्यक्तिमत्व असतं. प्रत्येकाच्या अक्षराचं वळण वेगळं, लिहिण्याची स्टाइल वेगळी, भाषेचा बाज वेगळा, इतकंच काय तर शाई सुद्धा वेगळी असते. आधी आईच्या पत्रांचा गठ्ठा घेउन वाचून काढला. आम्हाला तिघांना वाढदिवसाला शुभेच्छा देणारी, गरोदरपणात मी इथे एकटी म्हणून मला सूचना देणारी, अनेक पाककृती लिहून पाठवणारी आई भेटली. आई कधीच फारसं शब्द-बंबाळ किंवा इमोशनल बोलत/लिहित नाही. त्यामुळेच खरं तर तिची पत्र परत परत वाचावीशी वाटतात. तशीच काका, काकू, आत्त्या, मावश्यांची पत्र! मी भावंडांमधे सगळ्यात लहान. त्यामुळे अजुनही बरेचदा प्रत्यक्षात आणि पत्रातही सगळ्यांची तीच भावना दिसते. आजही त्यांची पत्रं मला थेट लहानपणातच नेवून सोडतात. आपल्यावर वेगावेगळे संस्कार करणारी, आपल्या अनेक छोट्या मोठ्या यशामधे आपलं कौतुक करणारी, कठीण काळात आपल्या बरोबर असणारी एवढी माणसं देवानी आपल्याला दिल्येत ह्या बद्दल, माझ्या या माणसांना "वाचताना" आज पुन्हा एकदा कृतज्ञता वाटली. माझ्या ह्या खजिन्यात अजुन एका व्यक्तीनी मोलाची भर घातली ती म्हणजे माझी मैत्रिण आरती. तिनी मला इतक्या वर्षात असंख्य पत्र लिहिली होती. काही वर्षांपूर्वी अनपेक्षितपणानी या जगातून ती निघून गेली. पण तिची सगळी जुनी पत्र वाचताना ती आजही मला भेटते. तिच्या आठवणी तर आहेतच मनात. पण त्या सगळ्या तिची जुनी पत्र वाचताना पुन्हा पुन्हा ताज्या होतात.
या सगळ्या जुन्या पत्रांना एक छानशी ऊब आहे, अगदी आजीच्या साडीच्या गोधडी सारखी. जी इ-मेल, ऑरकुट स्कॅप वाचताना कधीच जाणवत नाही.
हल्ली तर नवरयानी सगळी जुनी पत्रं स्कॅन करून ठेवल्यामुळे हा गठ्ठा नाही ठेवला तरी चालेल असं त्याला वाटतं. पण ती स्कॅन केलेली पत्रं मला त्यांचा उबदार स्पर्श कसा देतील?
"आई तुला पत्राची वाट बघायला इतकं का आवडतं?" अवनीच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून तिला सुद्धा या आठवणींचा ठेवा जतन करायची सवय लावायला हवी.

बुधवार, ३० जून, २०१०
FIFA मधला जपान
दक्षिण आफ्रिकेत फुटबॉल धमाका चाललाय. तसा मला फुटबॉल मधे काही फारसा रस नव्हता. म्हणजे क्रिकेट मधे जितका "आहे" म्हणता येईल त्यापेक्षाही कमीच! हा खेळ मला कायम "रावडी" म्हणतात, तसा वाटतो. पण माझा भाचा नील (वय वर्ष ८) मात्र हयात पूर्णपणे बुडून गेलाय. प्रचंड excite होउन तो सगळे ग्रुप्स, त्यातल्या टीम्स, खेळाडु, त्यांचे ड्रेसेस ह्यावर बोलत असतो. त्यातुन जपानची मॅच असली तर ह्या उत्साहाला चार चाँद लागतात! "आत्त्या... माहित्ये का कालच्या मॅच मधे काय झालं... " असं म्हणून रोज माझ्या ज्ञानात काही न काही तरी भर घातली जातेच. त्यामुळे आपोआपच मी सुद्धा त्याच्या बरोबर उत्साहानी हयात ओढली जाते. दुर्दैवानी ह्या चित्रात भारत कुठेच नाही. त्यामुळे आमचा पाठिंबा अर्थातच कर्मभूमी जपानला! जपानच्या मॅचेस बघताना जाणवायचं ते त्यांचं team work, त्यांचं झपाटलेपण.
जपानची आगेकूच फार जबरदस्त चालु होती. त्यामुळे परवा रात्री जपान विरुद्ध पॅराग्वेची मॅच कधी नव्हे ते सगळ्यांबरोबर अगदी जागुन बघितली. अर्थात त्यातले details मला अजिबातच कळत नाहीत. त्यामुळे फक्त जपानी खेळाडू कसे खेळतात आणि जपान जिंकतय का हरतंय ह्यातच मला जास्त रस होता. फीफा २०१० सामन्यांमधला मधला पहिला पेनाल्टी शूट आउट सामना! जपानची एक पेनाल्टी किक चुकली आणि शेवटी पॅराग्वेनी बाजी मारली. युईची कोमानोला रडताना बघून आयुष्यात पहिल्यांदाच फुटबॉल बघताना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. स्पर्शुन गेलं ते सगळ्यांचं कोमानोला समजुन घेणं, त्याला धीर देणं. कोणीही 'त्याची पेनाल्टी किक चुकली म्हणून मॅच हातातून गेली' असं साध्या gesture मधून सुद्धा जाणवू दिलं नाही. सामना संपल्यावर कोच किंवा खेळाडू "आम्ही टीम म्हणून कुठेतरी कमी पडलो" असंच पत्रकारांना सांगत होते.
हा समाजच मोठा अजब! यश असो नाहीतर अपयश. ते कुणा एका व्यक्तीचं न मानता सगळ्या टीमचं मानतात. कुठल्याही गोष्टीत राष्ट्र म्हणून एकत्र येउन मनापासून प्रयत्न करण्यावर भर देतात. संपूर्ण जपानला आपल्या अश्या खेळाडुंचा अभिमान न वाटला तरच आश्चर्य! म्हणुनच जेव्हा सगळी टीम दक्षिण आफ्रिकेहून परत येईल, ती ताठ मानेनीच:)
FIFA World Cup च्या निमित्तानी या राष्ट्राच्या मानसिकतेला माझा सलाम!
ताजा कलम: काल रात्री TV वर बघितलं. जपानची टीम परत आली. Airport वर त्यांच्या स्वागताला खुप लोकं हजर होती. यूईची कोमानो नी पत्रकार परीषदेत सांगितलं की "मॅच संपल्याच्या त्या क्षणापासून टीम-मेट्स नी मला एकटं सोडलेलं नाही. म्हणुनच आज मी ताठ मानेनी तुमच्या समोर उभा आहे. या टीमचा मी एक सदस्य असल्याचा मला अभिमान आहे."

शनिवार, २६ जून, २०१०
अस्सं सासर द्वाड बाई...
नुकताच अनिल अवचटांचा "डॉक्टरी" हा लेख वाचला. त्यात त्यांनी म्हटलय की एम् बी बी एस ला असताना त्यांना दहा डिलिव्हरीज प्रत्यक्ष करायला लागायच्या. तेंव्हा ससूनच्या लेबर रूम मधे कंगाल वर्गातल्या बायका प्रसुती वेदनेनी विव्हळताना नवरा आणि सासूला खच्चून घाण घाण शिव्या देताना दिसायच्या. तिथल्या एका नर्सनी अवचटांना सांगितलं की "या बायांच्यात अशी समजूत आहे, सासूला-नवरयाला शिव्या दिल्या की बाई लवकर मोकळी होते." यावरची अवचटांची प्रतिक्रया होती "त्या शिव्या खरयाही असू शकतील. कदाचित वर्षानुवर्ष आत दाबुन ठेवलेलं या वेळी बाहेर पडत असेल."
माझ्याही मनात आलं, "अरेच्चा! खरंच .... हे सुद्धा बायकांचं एक प्रकारचं स्ट्रेस मॅनेजमेंटच की! "
अचानक मला आमचा मागच्या वर्षीचा "भोंडला" आठवला.
नवरात्रात लहानपणी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणायला काय धमाल यायची! कितीही मोठं झालं तरी भोंडल्यातला आनंद काही कमी होत नाही. अजुनही नवरात्र जवळ येत चाललं की दर वर्षी आम्हा तोक्यो मधल्या मैत्रिणिंना भोंडला करायचे वेध लागायला लागतात. भोंडल्याच्या निमित्तानी आम्हाला आमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळाही द्यायचा असतो. त्याच बरोबर आमच्या मुलींनाही भोंडला प्रकारची ओळख करून द्यायची असते. मग त्या नऊ दिवसातला एखादा वीकएंड बघून आमचा भोंडल्याचा दिवस नक्की होतो. आता आपोआपच भोंडल्याची गाणी ओठावर यायला लागतात. मुली सुद्धा ही गाणी येतील तशी म्हणायला लागतात. "एक लिंबू झेलु बाई दोन लिंबं झेलु" आणि "वेड्याची बायको" ही गाणी तर सगळ्या मुलींची अगदी आवडती! "किती वर्षं अजुन ही निरर्थक, बाष्कळ गाणी म्हणत राहणार तुम्ही?" असा घराचा आहेरही मिळतोच. तर या वर्षी सुद्धा ती गाणी म्हणून झाल्यावर उत्साहानी "सासरच्या वाटे कुचुकुचु काटे" पासुन सुरुवात केली. पुढे सईच्या गाण्यातला घाणेरडा दिसणारा सासरचा वैद्य आणि राजासारखा दिसणारा माहेराचा वैद्य आला. "कारल्याच्या वेलातलं" खेळायला मिळणारं सुरेख माहेर आणि कोंडून घालणारं द्वाड सासर आलं. रुसून माहेरी गेलेल्या मुलीला न्यायला सासरचे सगळे लोकं आले पण नवरा आल्याशिवाय काही तिनी रुसवा सोडला नाही. नणंदभावजयीचे रुसवे फुगवे आले.
या वर्षी भोंडल्यानंतर काही दिवसांनी अवनीनी विचारलं, "आई, माहेर म्हणजे तुझ्या आईचं घर आणि बाबाच्या आईचं घर म्हणजे तुझं सासर ना?" म्हटलं "हो. का ग?" तर म्हणाली "पण मग दोन्ही घरं छानच आहेत की! मग कशाला भोंडल्यात सासरला नावं ठेवली?" मला हसू आवरेना. मला जमेल तसं आणि तिला कळेल असं मी समजावून सांगितलं. पूर्वी मुलींना शिक्षण नव्हतं, सासरी एकत्र कुटुंबात खरोखरच जाच होता. माहेरी जाणं तसं सोपं नव्हतं. त्यात "सोशिकपणा" हा गुणधर्म सोडूनही चालायचं नाही. कोणापाशी मन मोकळं करता यायचं नाही. त्यामुळे खुप कोंडमारा ह्वायचा. त्याला एक मोकळी वाट मिळावी, सासरच्या नावानी अगदी officially वाईट बोलता यावं म्हणून ही भोंडल्याची गाणी अशी रचली असावीत. आपण रुसून माहेरी गेलो, तर सासरचे सगळे आपली मनधरणी करतील, समजूत घालतील, सासू आपल्याला संसारात काही अधिकार देइल या कल्पनेच्या खेळात त्या घटकाभर रमत असतील. मनात आलं हेच ते स्ट्रेस मॅनेजमेंट असावं पूर्वीच्या बायकांचं।
आज आम्ही सुशिक्षित आहोत, परदेशी राहतो. आमच्यावर पूर्वी सारखी बंधनं नाहीत, आम्हाला कोणाचा सासुरवास नाही. त्यामुळे आम्हाला भोंडल्याच्या गाण्यांच्या अर्थाशी अडकुन बसण्याचं कारण नाही. तरीही "जुनी पद्धत" म्हणून फक्त नाक मुरडण्यापेक्षा निव्वळ एक स्ट्रेस रिलीज करणारा प्रकार म्हणून जुन्या परंपराचा उपयोग करायला काय हरकत आहे? म्हणजे मग एरवीच्या गप्पांमधे सासू, नवरा या विषयांवर निरर्थक गॉसिप करण्यासारखं काही राहणार नाही. शेवटी काय घटकाभर एकत्र येउन निखळ आनंद घेणं महत्वाचं! नाही का?

मंगळवार, १८ मे, २०१०
मनाचे श्लोक
माझ्या लहानपणची गोष्ट. तेंव्हा मी सहावी सातवीत असेन. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेसाठी रामदासस्वामींच्या "मनाच्या श्लोकांवर" भाषण तयार करायचं होतं. मी घरी येऊन आई बाबांना स्पर्धेबद्दल सांगितलं. शाळेत आणि घरी जेवढे काही श्लोक पाठ करून घेतले होते, तेवढे माझे चोख पाठ होते. त्यामुळे आपला अगदी हातखंडा असलेल्या एका विषयावर आपल्याला भाषण लिहायचेय, अश्या काहीश्या भ्रमात मी होते हे आठवतंय. मग बाबांच्या मदतीनी भाषणाचे सगळे मुद्दे काढले. त्यांच्याच मदतीनी मुद्देसुद बांधणी केली आणि स्पर्धेमधे छान भाषण देऊन आले. स्पर्धेचा निकाल लागला. मला त्यात पहिलं बक्षिस मिळालं. खरंतर जवळ जवळ सगळं श्रेय बाबांचंच होतं. तरी घरी आणि शाळेत माझंच खुप कौतुक झालं. आपल्या वक्तृत्व कौशल्या बरोबरच श्लोकांच्या पाठांतरामुळे आपल्याला हे बक्षिस मिळालं, म्हणजे मनाचे श्लोकही आपल्याला कळलेत अशी माझी पक्की समजूत झाली.
या गोष्टीला 20 वर्ष होउन गेली. माझी मुलगी अवनी सहा वर्षाची झाली. शाळेत हिन्दी भाषा शिकत असल्यामुळे तिला मराठीही वाचता येत होतंच. म्हणून मग संध्याकाळी शुभंकरोतिच्या जोडीनं मी तिला आता थोडे थोडे मनाचे श्लोक वाचायला शिकवायला लागले. तिला सुद्धा हे श्लोक रोज म्हणायला, मधून मधून त्याचा अर्थ समजुन घ्यायला खूप आवडत होतं. मी माझ्या परीनी मला जमेल तसा सोप्या शब्दात तिला अर्थ सांगत गेले. एकीकडे असंही वाटत होतं की तिचं हे वय तर परीकथेच्या, राजा-राणीच्या विश्वात रमण्याचं आहे. इतक्या लहान वयातच आपण तिच्यावर ह्या विचारांचं ओझं तर नाही न लादत?
अवनीच्या शाळेत मधे एकदा कसली तरी स्पर्धा होती. त्यात तिच्या एक मैत्रिणीला बक्षिस मिळालं.
घरी आल्यावर अवनी मला म्हणाली, "आई खरं म्हणजे मला आधी थोडं वाईट वाटलं की मला नाही बक्षिस मिळालं. पण नंतर मलाच आठवलं, रामदास स्वामींनी लिहिलय न 'नको रे मना मत्सरू दंभभारू'. म्हणून मग मला काही जेलस नाही वाटलं नंतर."
मनाच्या श्लोकाचा अर्थ इतक्या लहान वयात आत्मसाद करणं कुठून जमलं असेल हिला? पेराल ते उगवतं म्हणतात ते हेच का?
मनाच्या श्लोकांनी मला आज खूप काही दिलं.
वक्तृत्व स्पर्धेतला माझ्या त्या पहिल्या बक्षिसापेक्षा कितीतरी मोलाचं!

गुरुवार, १३ मे, २०१०
एक अनुभव भातशेतीचा
मार्च महिना सुरु झाला. झाडं पुन्हा एकदा पानाफुलांनी नटली. हुश्श! एकदाचा वसंत ऋतू आला.
आता थंडी हळूहळू कमी होउन हवा छान उबदार होणार म्हणून आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
थंडीचे सगळे दिवस या वसंताच्या वाटेकडे डोळे लावूनच काढले होते.
एप्रिलचा शेवट आणि मे चे पाहिले ३-४ दिवस अशी जोडून सुट्टी असलेल्या "गोल्डन वीक" चे वेध आता लागले. सुट्टीत सगळ्यांचे कुठे कुठे जायचे बेत ठरायला लागले.
"या वर्षी आपल्याला 'नाकाजिमा' आणि 'हातानो' या दोन जपानी कुटुंबाबरोबर एक दिवस भातशेती करायला जायचंय" असं एक दिवस हेमंतनी जाहीर केलं. त्यातले नाकाजीमा हे हेमंतचे कलीग आणि हातानो हे नाकाजिमांचे family friend. नाकाजिमा आणि हातानो यांच्या मुली अनुक्रमे 'हानाए' आणि 'तोमोका' ह्या दोघी अवनीच्या बरोबरीच्या. त्यामुळे ती पण अगदी खूष होती.
ही सगळी लोकं गेली ३ वर्ष ह्या शेतात पेरणी, कापणी, मळणी ह्या कामांना जातायत.
आमचा हा पहिलाच अनुभव. आत्तापर्यंत भात पेरणं फक्त सिनेमात बघितलेलं किंवा गो नी दांडेकरांच्या पुस्तकात वाचलेलं. त्यामुळे आम्हाला जबरदस्त excitement होती. त्यातून शहरी धावपळीपासून दूर खेड्यात जायचं आकर्षणही होतंच.
नाकाजीमांनी अगदी टिपिकल जपानी पद्धतीनी दोन दिवसांच्या ट्रिपची रूपरेषा आम्हाला आधीच देऊन ठेवली होती. त्यांनी दिलेल्या यादीनुसार सामान घेऊन आमच्या पहिल्या-वहिल्या शेतकामासाठी सज्ज झालो.
फार ट्राफिक मधे अडकायच्या आत पोहोचावं म्हणून सकाळी सकाळी लवकरच निघालो.
पण आमच्या सारखाच विचार खूप लोकांनी केलेला दिसत होता. त्यामुळे २ तासांच्या अंतरावर पोचायला आम्हाला तब्बल ६ तास लागले. शेवटी एकदाचे आम्ही २ वाजता इप्सित स्थळी पोचलो. मग भरपेट जेवून आणि समुद्रावर मनमुराद भटकून संध्याकाळी आम्ही गेलो आमच्या राहाण्याच्या ठिकाणी. तिथे अजून एक मजेदार कार्यक्रम आमची वाट बघत होता तो म्हणजे वेजिटेरियन सुशी तयार करण्याचा.
रात्रीच्या जेवणाला ज्या सुशी असणार होत्या त्यातल्याच काही आम्हाला तयार करायच्या होत्या. सुशी तयार करणं हे किती नाजुक, कलाकुसर असणारं आणि तितकंच खटपटीचं काम आहे हे तेंव्हा कळलं. एक आजी सुशी करायला शिकवत होत्या आणि २/३ आज्या आम्हाला मदत करत होत्या.

रात्रीचं जेवण हा एक खूप सुखद अनुभव होता. जेवणाच्या आधी त्या भातशेताच्या सगळ्या ट्रस्टीज आणि इतर मंडळींशी ओळख परेड, कोण जपानच्या कुठल्या कुठल्या भागातून आलाय त्याची माहिती आणि मग जेवणाच्या जोडीला पोटभर अनौपचारिक गप्पा! ही सगळी ५० ते ६० लोकं मिळून आम्ही उद्या एकत्र काम करणार होतो. जपानी माणसं इतकी मनमोकळी आणि अनौपचारिक वागताना मी बहुदा पहिल्यांदाच बघितली. कदाचित खेड्यातल्या मोकळ्या वातावरणानी ही माणसंही इतकी मोकळी झाली असावीत. बराच वेळ गप्पा चालल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून झाल्यावर पायात मोट्ठे रबरी बूट चढवून आम्ही सगळे औट घटकेचे शेतकरी निघालो खाचरांमधे भात पेरायला. तिथल्या शेतकरी आजी आजोबांनी आम्हाला पेरणी कशी करायची ते आधी नीट समजावून सांगितलं. भाताची ४ ते ५ रोपं एका वेळी घेवुन ती पेरायाची, रोपांमधे १० ते १५ सेटींमीटरचं अंतर ठेवायचं हे सगळं नीट समजावून घेतलं. आता उत्साहानी खाचरात पाय घातला. तो अपेक्षेपेक्षा खूपच खोल गेला. हे काम वाटतंय तेवढं सोपं नाही हे लक्षात आलं. मग दबकत दबकत आम्ही कामाला लागलो. हळूहळू कामाला वेग येत गेला. अधुन मधुन कुणी कुणी चुकत होतं. मग साधारण सत्तरीच्या घरातल्या एक कडक आजीबाई त्यांना ओरडत होत्या. लहान मोठं कोणाचीच चूक त्यांच्या तीक्ष्ण नजरेतुन सुटत नव्हती. अवनी, हानाए आणि तोमोकानी सुद्धा प्रसंगी आजींची बोलणी खात जवळ जवळ अडीच तास आमच्या बरोबर काम केलं.

पेरणी झाल्यावर मग तिथेच सगळ्यांसाठी जेवण होतं. ते करून मग मुली गेल्या गवतात नवनवीन कीडे शोधायला. काही कीडे त्यांनी खास किड्यांसाठी असलेल्या बास्केट मधेही गोळा केले. हानाएच्या मदतीनी अवनीनी चक्क छोटे बेडूक सुद्धा पकडले.

जेवण, गप्पा झाल्यावर काल नव्यानीच ओळखी झालेल्या सगळ्यांचा निरोप घेऊन, आम्ही ३ कुटुंबांनी तिथुन प्रस्थान केलं.
जेवणाआधी जरी चिखलाचे हातपाय धुतले होते तरी म्हणावं तसं समाधान नव्हतं झालं. म्हणुन मग पुढे आम्ही गेलो ओनसेन म्हणजेच हॉट स्प्रिंगज मधे आंघोळ करायला. हॉट स्प्रिंगज मधे relax होणं हा खरंच एक सुखद अनुभव असतो. आणि त्यानंतर जपानी पद्धतीचं गरम गरम जेवण म्हणजे तर आहाहा!
आता हळूहळू आवरून निघायची वेळ झाली.
२ दिवस कसे गेले कळलंच नाही. एवढं भटकलो, काम केलं तरी थकवा आला नाही. गोल्डन वीकच्या सुट्टीचा अनुभव खरोखरच "गोल्डन" होता.